Monday, July 11, 2011

Faces of Rain

पावसा तुझी रूपे किती ?
चैतन्य, समृद्धी, उत्साह, संजीवनी, जीवन आणि पूर, विध्वंस, घात आणि बरेच काही... कोकणवासीयांनी गेल्या दोन महिन्यांत या साऱ्या छटा अनुभवल्या. पण तरीही पावसामुळे कोकणातील गावागावांतील बहरलेला निसर्ग आपल्या सौंदर्याने खेचून घेतोच आहे. यामध्ये बागडणारी फुलपाखरे, पक्षी आपल्या अस्तित्वाने निसर्गधून तयार करीत आहेत आणि ही धून पावले वळवून नेत आहेत. कोकणचं सौंदर्य पाहायचं, अनुभवायचं, डोळ्यात साठवून घ्यायचं तर आताच भटकंतीला बाहेर पडायला हवं.
पाऊस रुद्रावतार घेऊन आला
* 1 जूनपासून पावसाचे आगमन
* अतिवृष्टीने 30 कोटींची हानी
* 97 गावांतील 1418 हेक्‍टर भातशेतीत पाणी
* कोकण रेल्वे 11 दिवस विस्कळित
* आंबोलीत दरड कोसळून वाहतूक ठप्प
* कोकणात अनेक गावांत अतिवृष्टीने पूरस्थिती
* सलग 15 दिवस अतिवृष्टीची नोंद
आणि चैतन्य भरले
* पावसामुळे कोकण हिरवागार
* सह्याद्रीच्या रांगांत उमटले शेकडो जलप्रपात
* आंबोली, मार्लेश्‍वरमध्ये वर्षा पर्यटनाचे आकर्षण
* हिरव्यागार शेतांनी चैतन्यात भर
* पशु-पक्ष्यांच्या बागडण्याने निसर्ग बहरला
आरोग्याची झाली दैना
* पावसाबरोबरच डासांच्या उपद्रवात वाढ
* गावोगाव तापसरीच्या रुग्णांत वाढ
* आधीच अपुऱ्या आरोग्य यंत्रणेची तारांबळ
* मलेरिया, लेप्टोचेही रुग्ण आढळले
* सरकारी, खासगी दवाखान्यांचा हंगाम तेजीत
धार्मिकतेला आणला बहर
* गावोगावी गणेशोत्सवाचे वेध
* गणेशमूर्ती शाळांमध्ये गजबज
* गणेशोत्सवासाठी मुंबईकर चाकरमान्यांची आरक्षणासाठी धडपड
* गावोगावी हरिनाम सप्ताह
* श्रावण मासाच्या आगमनाची प्रतीक्षा
नद्या-नाल्यांना दिले बळ
* नद्या-नाल्यांना ओसंडून पाणी
* डोंगरकपारीतून निर्झरांना तोंड
* शेतजमिनीला पाण्यामुळे संजीवनी
* पावसाच्या रिमझिम सरीचे आकर्षण
Credit of Information : Sakal News, reference nod : http://www.esakal.com/esakal/20100807/5208898427004532260.htm

No comments: